अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर येथील संविधान चौक येथे जीवन तारा हॉस्पिटल समोरून चालणाऱ्या व्यक्तीकडून जबरदस्तीने दमदाटी करून पैसे घेणारा शुभम देशमुख उर्फ दाऊद तसेच त्याचा साथीदार सह अंमळनेर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेब व त्यांच्या टीमने मोठ्या शिताफीने अटक केली शुभम देशमुख याच्या दहशतीला कोणीही न घाबरता त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास पुढे यावे, असे आव्हान पोलीस निरीक्षक अमळनेर यांनी केले आहे.पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात पटाईत असलेला व कोणालाही धोकेदायक असलेला शुभम देशमुख याला बेड्या ठोकून त्याची वरात काढण्याची परवानगी जयपाल हिरे यांनी घेतली व त्याला अमळनेर शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरविले जेणेकरून त्याच्याबद्दल कोणतीही दहशत जनसामान्यांच्या मनात राहू नये व त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही हिम्मत करावी . तेवीस गुन्ह्यामध्ये हवा असलेला शिवम देशमुख उर्फ स्वयंघोषित दाऊद याच्या मुसक्या आवडल्याने अमळनेर शहरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला या कारवाईमुळे अमळनेर चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खान्देश समाचार न्यूज
