अमळनेर:-(प्रतिनिधी)अमळनेर शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या आसपास असून किमान 50 टक्के जनतेला महिला बाळ कल्याण विभागाच्या सेवानची गरज आहे परंतु प्रत्यक्षात शहरात 26च अंगणवाडी केंद्रे आहेत अजून किमान पंचवीस अंगणवाड्यांची आवश्यकता आहे.शहरात अंगणवाडी केंद्रे संख्या वाढवावी म्हणून जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे आमदार श्री अनिल पाटील अनिल भाईदास पाटील यांना निवेदन देण्यात आले आहेे.
याबाबत सविस्तर असे की ,शहरी भागातील अंगणवाडी भरती स्थगित असून शहरी भागातील अनेक जागाही रिक्त असून माझ्या लोकसंख्येच्या मानाने केंद्रे भरण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार काळात 2011साली शहरातील अंगणवाडी भरती स्थगित ठेवली आहे तो शहरी गरीब जनते चे हिता विरुध्द निर्णय 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कायम ठेवण्यात आले आहे. शहरी भागातील गरीब गरजू माता बालके यांना महिला बाल कल्याण प्रकल्प अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा व सेवेपासून वंचित च ठेवले आहेत त्यात सर्व जिल्ह्यात शेकडो जागा रिक्त तर आहेत त्याबरोबर अंगणवाडी केंद्रे ही अत्यंत कमी आहे त म्हणून शहरी भागात अंगणवाड्या वाढवा अशी मागणी करत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन चे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांच्या नेतृत्वात शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अनिल भाईदास पाटील यांना परवा रोजी निवेदन सादर केले व याप्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती केली त्यानुसार आ श्री पाटील यांनी ताबडतोबीने जिल्हा महिला बालकल्याण नागरी जिल्हा कार्यालय ला संपर्क करवून यासंदर्भातील सत्य परिस्थिती जाणून घेतली. असता त्यांना उत्तर मिळाले की, जिल्ह्यातील शहरी भागातील अंगणवाड्या केंद्र वाढवा म्हणून महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यासंदर्भात केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे म्हणून जागा भारत येत नाही आमदार अनिल पाटील यांनी ही सर्व माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मार्फत केंद्र सरकार कडे शहरी अंगणवाडी केंद्रीय वाढवण्याच्या दृष्टीने विधानसभेत आवाज उठवू केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले शहरी अंगणवाडी प्रश्नी प्रथमच आय टक ने वाचा फोडायला सुरुवात केली असून जिल्ह्यात या आंदोलन छेडण्याचा इशारा युनियन अध्यक्ष कॉम्रेड अम्रुत महाजन यांनी दिला आहे आमदार पाटील यांना निवेदन देण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी सुदर्शणा पाटील ज्योती पाटील अनिता खैरनार सुनंदा पाटील प्रतिभा चौधरी सुनंदा कांबळे ,सुनिता जगताप संगीता पाटील वसाने बाई सुनंदा बारी साधना शार्दुल रेखा पाटील अलका चौधरी संगीता राजेंद्र पाटील आदी पंधरा अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
खान्देश समाचार न्यूज..
