अमळनेर:-(प्रतिनिधी) अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारने दुकानावरील फलक मराठी भाषेत संदर्भा विषयी कायदा पारित करून मनसेच्या 2008 या आंदोलनाची पाठराखण करत महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाने मराठी भाषेत फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे,त्या निमित्ताने मनसेचा विजय असल्याने अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यात जल्लोष साजरा करत प्रत्येक मराठी भाषेतील फलक लावलेल्या दुकानदारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता. व ज्यांनी इंग्रजी भाषेत फलक लावले आहेत त्यांना मनसे मार्फत तंबी ही देण्यात आली होती तरी पण काही दुकानदार यानी अजूनही इंग्रजी भाषेचे फलक दुकानावरून बदवली नाही, तर 26 तारीख चे आत मराठी भाषेत लिहलेली फलक दुकानाला लावली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेरआपले दुकानाला लावलेले फलक काळे करण्यात येईल, असे निवेदन दुकानदारांना देण्यात आले. मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहर अध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ) ,शहर उपाध्यक्ष दिनेश माने (बाळू माने) रावसाहेब पाटील, जयेश चौधरी व मनसे सैनिक उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज..
