अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीबेरात्री होणाऱ्या चोऱ्या,दरोडा इत्यदी घटनांना आळा बसवण्यासाठी तालुक्यातील बारा गावांमध्ये ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यात आले असून सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले. गावाच्या सुरक्षेसाठी या पथकाचा मोठा फायदा होणार आहे.
जळगांव जिल्हयातील ग्रामीण भागात वाढलेल्या चोऱ्या , जनावर चोऱ्या व घरफोडया यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गावागावात ” ग्राम संरक्षण पथक ” स्थापन करण्येबाबत आदेश दिले होते. त्यासंबंधात उपविभागीय पोलीस अधिकारी मा.राकेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली वरील बारा गावांची बैठक पोलीस स्टेशनला घेण्यात आली . सर्वांना लाठी , शिटी व ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रत्येक गावात रोज रात्री ०४ ग्राम रक्षक रात्री १२ ते सकाळी ०५:०० वाजे पर्यंत गस्त घालणार असून आजूबाजूच्या चार गावांचा मिळून एक व्हॉटसअॅप गृप तयार करुन त्याद्वारे सर्व ग्रामरक्षक एकमेकांशी संपर्क साधणार आहेत . या व्हॉटसअॅप गृपमध्ये सर्व अधिकारी , बीट अंमलदार , पोलीस पाटील , चालक व गावातील प्रतिष्ठीत नागरीक राहणार असून जनावर चोऱ्या , ईलेक्ट्रीक मोटर चोरी , ठिबक चोरी , इतर अवजारे , मोटार सायकल चोरी इत्यादी प्रकारांना प्रतिबंद करण्यास मदत होणार आहेत . वरील पथक स्थापन करण्यात सर्व गावांचे पोलीस पाटील , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक यांच्यासह जानवे जवखेडा बीटचे अधिकारी पोउपनि गंभीर शिंदे अंमलदार कैलास शिंदे , हितेश चिंचोरे , जनार्दन पाटील , भुषण पाटील , योगेश महाजन तसेच प्रभारी अधिकारी जयपाल हिरे , गोपनीय अंमलदार डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील , सिध्दार्थ सिसोदे यांनी ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली आहे .
खान्देश समाचार न्यूज
