अमळनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन निमित्त अमळनेर मनसे परिवारातर्फे शासकीय रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला होता. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्य करून सोळा वर्षे संघर्षाच्या त्यागाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयात गोरगरीब लोकांना अमळनेर मनसे तर्फे फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी
तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे),धनंजय साळुंके शहराध्यक्ष (धनु भाऊ) मनसे सैनिक रावसाहेब पाटील, महेश मोरे व आधी मनसैनिक उपस्थित होते.
