अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील
नंदादीप फाउंडेशन तथा आसरा इन्नोवेशन अँड मल्टिपर्पज फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर येथे प्रबुद्ध विहारात ११ ते १३ एप्रिल दरम्यान महामानवांच्या संयुक्त जयंती निम्मित “संविधान जागर कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रमुख वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते, ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्टार्टअप इंडिया प्रतिनिधी प्रा. विनायक पाटील यांनी आपल्या अमोघ वकृत्वाने प्रेक्षकांना खिडवून ठेवले.
त्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जयपाल हिरे पोलीस निरीक्षक अमळनेर, व मा. नरसिंह वाघ पोलीस उप निरीक्षक अमळनेर व मा. सविता संदानशिव माजी नगरसेविका , मा. उषाबाई नेतकर माजी नगरसेविका कार्यक्रमास उपस्थित होते , तरी पहिल्या दिवशी ५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
त्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जयपाल हिरे पोलीस निरीक्षक अमळनेर, व मा. नरसिंह वाघ पोलीस उप निरीक्षक अमळनेर व मा. सविता संदानशिव माजी नगरसेविका , मा. उषाबाई नेतकर माजी नगरसेविका कार्यक्रमास उपस्थित होते , तरी पहिल्या दिवशी ५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
तद नंतर १२ एप्रिल या दिवशी धनदाई महविद्यालयातील मराठा सेवा संघाचे प्रचारक प्रा. लिलाधर पाटील यांनी संविधानातील मानवी अधिकार व सामाजिक न्याय ह्या मुध्यांवर संबोधन केले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रा. डॉ. चंद्रकांत नेतकर, प्रा. मुकुंदा संदानशिव व योगराज संदानशिव उपस्थित होते. ह्या दिवशी ६० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी संविधान जागर कार्यशाळेचा लाभ घेतला.
समारोपाच्या अर्थात १३ एप्रिल रोजी बाल संरक्षण अधिकारी व संविधान अब्यासक नंदुरबार मा. गौतम वाघ यांनी साविधांच्या प्रस्थावानेची सखोल कार्यप्रणाली आणि संविधानातील विविध कलम, परिशिष्ट प्रश्नोत्तराच्या स्वरुपात विषद केली. या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक पवार व विमल ताई मैराळे माजी. केंद्र प्रमुख,प्रा. विजय गाढे, प्रा. विजय तूंटे, माजी सैनिक विनोद बिऱ्हाडे, प्रा. विजय वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते. ह्या दिवशी ५० पेक्षा अधिक प्रेक्षकानी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
तीन दिवशीय संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन नंदादीप फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. संदीप सैंदाणे व आसरा इन्नोवेशन अँड मल्टिपर्पज फाउंडेशन चे संचालक मा. राहुल बाविस्कर व मा. मनोज सोनवणे तसेच मूकनायक मासिकाचे विभागीय प्रतिनिधी मा. प्रवीण बैसाणे यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. राहुल बाविस्कर यांनी केले व आभार मा. संदीप सैंदाणे यांनी मानले.
कार्यक्रमास प्रबुद्ध हौसिंग सोसायटी, अमळनेर व भारत मुक्ती मोर्चा, व्यवस्था परिवर्तन मंच, भीम आर्मी अमळनेर यांचे विशेष सहकार्य लाभले.
तरी कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांचे नाव नोंदणी झालेली असून , त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल असे आयोजकांनी माहिती दिली आहे.


