कोट्यावधी रुपयांचे काम करत असताना रोड फुटणे ,पाईपलाईन तुटणे ते जैसे ते करून देऊन उत्कृष्ट प्रतीमध्ये काम करून देणे हे अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेले आहे. त्यासाठी स्वतंत्र बजेट आहे त्याला लागणारे सर्कल चेंबर्स व प्रॉपर्टी चेंबर्स हे रस्त्याच्या समतल असावे असे स्पष्ट आहे परंतु कंत्राटदाराने तसे न करता प्रॉपर्टी चेंबर आणि सर्कल चेंबर रस्त्यापासून 6 इंच वर खाली केलेले आहे त्या अनुषंगाने रस्त्याच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघात होतात तुटलेल्या रस्त्यांचे पॅचेस भरतांना कोणतेही तांत्रिक दृष्ट्या तंत्रशुद्ध नसून त्याची प्रतवारी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. सदर रस्त्याचे पॅचेस आणि चेम्बर्स साठी लागणारी रेती न वापरता डस्ट चा सर्रास वापर होताना दिसत आहे. त्यामुळे रस्ता लगेच तुटत आहे तरी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या संपूर्ण कोट्यावधी रुपयांच्या कामाचा भ्रष्टाचार थांबवून ,क्वालिटी कंट्रोल करून ,चांगल्या प्रतीचे काम करून घ्यावे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे .या कामांमध्ये कसलाही कचुराई व भ्रष्टाचार झाला असल्यास, उच्चस्तरीय चौकशी लावावी व कंत्राटदाराचा ते का रद्द करावा व त्याचे लायसन्स जप्त करावे अशी नागरिकांची मागणी केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पोट गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे;अमळनेर शहरातील रस्त्यांची दुर्दशा...
April 23, 2022
0
