जळगाव( प्रतिनिधी )भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन क्रांती मोर्चा अंतर्गत राष्ट्रीय ओबीसी वर्गा मार्फत ठरल्याप्रमाणे आता तिसऱ्या टप्प्यात भारत बंद आंदोलन करण्याचे निश्चित झाले आहे.
सदर चे आंदोलन मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय संयोजक ,अध्यक्ष- भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा) यांच्या नेतृत्वाखाली मा. चौधरी विकास पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष -राष्टीय ओबीसी वर्ग मोर्चा)हे आंदोलनाची संपूर्ण धुरा सांभाळणार आहेत. त्यासाठी समस्त बहुजन वर्गाने जाहीर समर्थन द्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
दि. 25 मे 2022 हा दिवस भारत बंद साठी निवडण्यात आला असून या भारत बंदमध्ये केंद्र सरकार द्वारे ओबीसी जाती आधारित जनगणना न करणे, EVM घोटाळ्याच्या विरोधात , खाजगी क्षेत्रात ओबीसी ,एससी, एसटी ना आरक्षण( प्रतिनिधित्व) लागू करण्यासाठी, एमएसपी चा गॅरंटी (हमीभाव) कायदा शेतकऱ्यांना बनवून देण्यासाठी, NRC/NPR/CAA विरोधात, जुनी पेन्शन स्कीम लागू करा, पंचायत राजच्या निवडणुकीत OBC आरक्षणात Separate Electrorate (स्वतंत्र मतदार संघ) लागू करण्यासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन करण्याच्या विरोधात, जबरदस्तीने vaccination देण्याच्या विरोधात, लाॅकडाऊनच्या काळात गुप्त पणे कामगारांच्या विरोधात बनवलेल्या कामगार कायद्यांच्या विरोधात
या वरील 10 मुद्द्यांवर राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या सर्व सहयोगी संघटनांचा सदर आंदोलनास सक्रिय पाठिंबा आहे. यासाठी सर्व बहुजनातील ओबीसी, एससी, एसटी अल्पसंख्यांकांच्या सर्व बांधवांनी आपल्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
