अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील सुप्रसिध्द जित स्टुडिओच्या माध्यमातून अमळनेर शहरात विविध प्रकारच्या स्पर्धेच्या, देशभक्तीपर कार्यक्रमांचं असे अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो, तसेच अमळनेरकरांचे प्रोत्साहन युक्त आशीर्वाद मिळत असतो.
तसेच आज दि.22 मे रोजी सायंकाळी 5 वा. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विविध क्षेत्रातील कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अंमळनेर गोट टॅलेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या कलागुणांना सादरीकरण करणार आहेत, नुत्य, समूह नृत्य, गायन, जिम्नॅस्टिक इत्यादी कलाकृती सादर होणार आहेत तरी अमळनेरातील श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेल जीत स्टुडिओची संचालक जितु संदानशिव सर यांनी आवाहन केले आहे.
तसेच या स्पर्धेत जज म्हणून सुप्रसिद्ध डान्स प्लस 2 विनर तसेच डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर फ्रेम तनय मल्हारा तसेच 2 mad विनर डान्स इंडिया डान्स फायनल लिस्ट शिवम वानखेडे आणि नाशिक येथील एक्टर्स अँड मॉडेल वैष्णवी जाधव या स्टार मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.

