अमळनेर:-(प्रतिनिधी) दि.5 मे रोजी अमळनेर तालुक्यात आम आदमी पार्टीची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीत सभासद नोंदणी अभियान राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच अमळनेर शहर व तालुक्यात शाखा स्थापन करण्याबाबत चर्चा झाली येत्या महिन्याभरात शहरात व ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्यात येणार आहेत.
तसेच पीक विमा व अवकाळी पाऊस नुकसान भरपाई लवकर मिळण्याबाबत धरणे आंदोलन दि.9 मे 2022 रोजी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. याच बरोबर अमळनेर तालुका आम आदमी पार्टी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तालुका संयोजकपदी बहादरवाडी येथील संतोष बाबुराव पाटील यांची व तालुका सचिव पदी भूपेंद्र पंडित पाटील.आणि सहसचिवपदी नाना अभिमन पाटील यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी जेष्ठ मार्गदर्शक माजी जि.प.सदस्य शिवाजी दौलत पाटील ,डॉ.रुपेश संचेती, जेष्ठ पत्रकार धनंजयभाऊ सोनार,प्रा.सतीश बडगुजर.आप्पा देवा दाभाडे,योगेश पाटील.आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.