अमळनेर (प्रतिनिधी)सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बारावी उत्तीर्ण व त्या पुढील वर्गातील विद्यार्थी व पालकांसाठी 8 ते 10 मे तीन दिवस करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन 8 मे सकाळी 8:30 वा. आय ए एस ओडिशाचे अधिकारी मनोज महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शन नोबेल फाउंडेशनचे जळगावचे अध्यक्ष जयदीप पाटील यांचे लाभणार आहे.
तसेच कार्यशाळेची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक राहणार आहे. करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा समारोप 10 मे सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.आर चौधरी निवृत्त प्राचार्य प्रताप कॉलेज अमळनेर तर प्रमुख पाहुणे अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व वित्त लेखाधिकारी कपिल पवार हे राहणार आहेत.
करियर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा ,गीतगायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा मंजुषा घेतल्या जाणार आहेत. सर्व उत्तीर्ण स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. सदर कार्यशाळा व मार्गदर्शन साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय टाऊन हॉल अमळनेर येथे होणार आहे. तरी नाव नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पालक व सानेगुरुजी वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ यांनी उपस्थिती दयावी असे आवाहन स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांनी कळविले आहे.
