अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे गावात दारूबंदी असताना दि.16 जूलै रोजी लोणे येथील दोन व्यक्ती खेडी व्यव्हारदळे गावात हातभट्टी दारू विक्री करत आहेत असे गावातील ग्राम सुरक्षा दलातील पवन पाटील तसेच संतोष वंजारी यांना कळाले.
त्यांनी आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने दारू विक्री करणाऱ्या पकडले आणि गावातील पोलीस पाटील लकीचंद पाटील यांचा सहाय्याने त्यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यांनी आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने दारू विक्री करणाऱ्या पकडले आणि गावातील पोलीस पाटील लकीचंद पाटील यांचा सहाय्याने त्यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच आपल्या गावात दारू विक्री सुरू राहिली तर लहान मुलांना देखील व्यसन लागु शकत आणि दारू मुळे गावात भांडण होतात तसेच गावातील वातावरण खराब होते. त्या मुळे आम्ही गावात दारू विक्री करू देणार नाही असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
तसेच दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून मुद्देमालासह मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे,तसेच गुन्हा नोंद करून पुढील तपास बीट हवालदार शिंपी करीत आहेत.
त्यावेळी सुनील लहु पाटील, गोकूळ वंजारी, सुभाष वंजारी, सागर पाटील, महेन्द पाटील, फिरन गजरे, सतीष पाटील, पांडुरंग पाटील, संदिप मधुकर पाटील, निंबा रामचंद्र पाटील, सरपंच व उपसरपंच उखा मोतीराम पाटील,माने सर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
खान्देश समाचार न्यूज, अमळनेर

