अमळनेर(प्रतिनिधी) येथील जीवन ज्योती कॉलनी समोरून जाणारा अत्यन्त वाहतुकीचा रस्ता बालाजी स्टील पासून ते भद्रा प्रतीक मॉल पर्यन्त जाणारा मुख्य रस्त्याचा अर्धा भाग गेल्या दोन तीन वर्षांपासून अत्यन्त खराब खड्डा मय झाला होता. सदर रस्ता दुरुस्ती संदर्भात कॉलनी वासीयांनी प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा अमळनेर नगरपरिषदेस विनंती अर्ज केले होते. परंतु अर्ज करूनही हा रस्ता दुरुस्त होत नव्हता.शेवटी प्रा.दाभाडे यांनी पीपीइ किट घालत मुन वॉक आंदोलन गेल्या वर्षी केले होते.यावेळी शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर प्रा.दाभाडे यांनी हे आंदोलन करून होती.तसेच खड्ड्यांमध्ये रोपे लावून गांधीगिरी करत
प्रशासनाला खड्डे मय रस्त्यांची अवस्था निदर्शनास आणून दिली सदर रस्ता हा सतत वाहतुकीचा असून ग्लोबल शाळेतील विद्यार्थी, सामान्य नागरिक,प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी ,या परिसरातील खाजगी कलासेस चे विद्यार्थी, रेल्वे स्थानकाकडे जाणारे नागरिक,तसेच ढेकू रोड,गलवाडे रोड,पिंपळे रोड,मारवड रोड कडे जाणारे प्रवासी यांची सतत वर्दळ असते.रस्ता खराब असल्या कारणाने सदर नागरिक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते.
त्याच प्रमाणे आंदोलनानंतर वारंवार अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्कात राहून सदर रस्ता दुरुस्ती संदर्भात पाठपुरावा केला.त्यामुळे मुख्याधिकारी सरोदे यांनी सदर रस्ता दुरुस्ती मनावर घेतली आणि रस्ता दुरुस्त करून दिला याबद्दल जीवन ज्योती कॉलनी वासीयांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यात प्रा.दाभाडे,हरीश जैन ,सीमा जैन,दक्षा शाह,अरविंद शाह,मनीष शाह,सोनू शाह,राजेंद्र शाह,राजुल शाह,लता शाह,सचिन जैन,संध्या भुतडा, भुतडा सर,संजय पटेल,विवेक बडगुजर,बडगुजर सर,सचिन अमृतकर,अनिता अमृतकर इत्यादी रहिवाशांनी अमळनेर नगर परिषदेचे आभार मानले आहेत.
