अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये पीटर पॅटर्डे निमित्त अनेक ऍक्टिव्हिटी चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पावसाचे महत्व पावसाळ्यात आरोग्यासाठी उपयोगी असलेले पदार्थ ,वस्त्र, यांचे महत्त्व विशद करण्यात आले .तसेच पावसाची निर्मिती ढगांची निर्मिती कशी होते ;याची प्रत्यक्ष कृती सौ.स्वप्ना कासार यांनी उत्कृष्टरित्या करून दाखविले. विद्यार्थ्यांकडून इंद्रधनुष्य ,कागदी नाव बनवणे ,बेडूक उड्या ऋतुमानातील वस्त्र ,बांबू पासून वस्तू बनविणे ,माती पासून वस्तू निर्मिती ,विद्यार्थ्यां ना मातीचे महत्व सांगून विद्यार्थ्या कडून माती पासून प्रत्यक्ष वस्तू तयार करून घेतल्या. सर्व विद्यार्थ्यांनी छत्री व रेनकोट घालून प्रार्थमिक विभागातील शिक्षिका सगळ्यांनी मिळून सामूहिक नृत्य सादर केले.
पीटर पॅटर्डे सादर करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका तसेच मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेचे प्राचार्य श्री.हेमंत कुमार देवरे तथा सौ.शितिका अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने पीटर पॅटर्डे चा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला.
खान्देश समाचार,अमळनेर
