अमळनेर ग्रामीण(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धानोरा व भोरटेक येथे दि.7जुलै रोजी दोन्ही गावातील जिल्हा परिषद शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट सेक्युरीटी गार्ड अँड जनरल वर्कर्स युनियन तर्फे स्कूल बॅग वाटप करण्यात आले,जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होईल व आपले देशाचे भविष्य घडेल या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दोन्ही गावातील शिक्षक वाघ सर, चव्हाण सर, साळुंखे सर, तसेच धानोरा सरपंच ठाकरे, भोरटेक उप सरपंच अमोल राजपूत, तसेच संघटनेचे पदाधिकारी सोमा कढरे, पूनम निकम, बापू पाटील, राजेंद्र माळी, गौतम पारवे, डॉ.राजेंद्र संदानशिव यांचे सहकार्य लाभले.
खान्देश समाचार
