अमळनेर(प्रतिनिधी)१३ ऑगस्ट रोजी कै. श्री.रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर
अमळनेर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ४ थी च्या सुमारे ५५० विद्यार्थ्यांची साकळी तयार करून ७५ अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांच्या साह्याने साकारण्यात आले. त्यावेळी
विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ३०० तर मुलींची संख्या २५० इतकी होती.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विद्यालयात शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात आहेत. अमृत महोत्सव नाव साकारणे ही संकल्पना शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत पवार यांनी मांडली व तिचे यशस्वी संचालनही केले. त्यावेळी अमृत महोत्सव नाव साकारणे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्ना शिसोदे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक अनंतकुमार सुर्यवंशी, दिलवरसिंग पाटील,सुरेश पवार, जागृती दहिवदकर,सुरेखा पाटील,बबिता चौधरी,वैशाली साळवे, वैशाली कोळी, मनिषा कासार ,नगराज सोनवणे यांनी ही परिश्रम घेतले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव नाव साकारणे या कृतीचे पालक खूप कौतुक करीत आहेत.
खान्देश समाचार,अमळनेर
संपर्क -9145442324
