अमळनेर(प्रतिनिधी)भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असून, देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशा ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत माळी वाडा व भोईवाडा येथील युवा बांधवांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.रक्तदानची चळवळ योग्य पध्दतीने सुरु असल्याचे समाधान रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी केले. आरोग्य विषयी केलेली मदत हि सदैव स्मरणात राहते,सोशल मिडियाचे सुयोग्य वापर अमळनेर तालुक्यात होत असुन "रक्तदात्यांची नगरी" अशी ओळख निर्माण झाली आहे. कुठाल्याही रक्तगटाची आवश्यकता लागताच तात्काळ रक्तदाते तयार होतात. सर्वच स्थरातुन लोकांचा सहभाग असतो, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असते, याच संपूर्ण श्रेय युवकांचे आहे.आज सुवर्ण पर्वाला पंकज शिंगाणे , विशाल चौधरी , जगदीश महाजन , मोतीलाल शिंगाणे , दीपक महाजन , मोन्टी साळी व योगेंद्र राजपूत यांनी रक्तदान करुन; एक आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. अमळनेर नगरीत रक्तदानचे कार्य हे सदैव सुरु राहील सर्वांना स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्त हार्दीक हार्दीक शुभेच्छा.....
खान्देश समाचार,अमळनेर
संपर्क -9145442324
