अमळनेर(प्रतिनिधी)
नोकरी लागताना शिक्षकांना कायद्यानुसार स्वत:ची ‘पात्रता’ सिद्ध करावी लागते. मात्र पैशांच्या जोरावर डीएड, बीएड झालेल्या अनेक धनिकांनी पात्रता परीक्षेतही पैसा फेकून नोकरी बळकावली. अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात असे शेकडो बोगस शिक्षक असल्याची यादी पुणे सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेला दिली आहे.आणि ती यादी खानदेश समाचार कडे अमळनेर तालुक्यातील नालायक शिक्षकांची यादी त्यांच्या संस्थेसह मिळाली आहे. त्यामुळे अमळनेर शहरासह तालुक्यातील बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या दोन वर्षातील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत तब्बल ७ हजार ८८८ शिक्षक पैसे देऊन पास झाल्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे. आता ही यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत.
एकीकडे बडतर्फीची टांगती तलवार तर दुसरीकडे फौजदारी कारवाईची धास्ती, अशा कात्रीत हे बोगस शिक्षक सापडले असून गावकऱ्यांच्या ‘नजरेला नजर’ कशी द्यावी, हाही प्रश्न पडल्याने ‘नालायक’ गुरुजी नातेवाइकांच्या गावात आश्रयाला तर कुणी पर्यटनाला निघून गेले आहेत.
दरम्यान खान्देश समाचारकडे अमळनेर तालुक्यातील बोगस शिक्षक ते कार्यरत असलेल्या संस्था व शाळांची नावे तसेच त्यांचा टीईटी प्रमाणपत्र क्रमांक असून प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने लवकरच जनतेसमोर ही सर्व माहिती प्रकाशित करणार आहोत..
खान्देश समाचार,अमळनेर
संपर्क -9145442324
