अमळनेर:-(प्रतिनिधी)अमळनेर शहरासह तालुकाभरातील निराधार, वयोवृद्ध, विधवा, अपंग आदी संजय गांधी/श्रावणबाळ, कुटुंब अर्थसहाय्य आदी विविध योजनांच्या लाभासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून(ऑनलाईन/ऑफलाईन) जमा करतात. मात्र, त्यांच्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी न करता निरर्थक व शुल्लक कारणांवरून, हस्स्यास्पद टिपण्या मारत काही प्रकरणे थेट नामंजूर करण्यात येतात.
यात लोकांचा वेळ, श्रम व पैसा वाया गेलेला असतो तर काही पुन्हा पुन्हा प्रक्रिया करतात तरी मात्र त्यांची प्रकरणे मंजूर होत नाहीत. वारंवार खेटा घालून काम होत नाही व संगांयो विभागातील कर्मचार्यांकडून योग्य वागणूक व समाधानकारक उत्तरे मिळत नाही यामुळे त्यांची हेळसांड व मनस्ताप होतो. या असंतोषामुळे संगांयो विभागातील कर्मचारी व लोकांमध्ये वारंवार वादविवाद होतात. यासह कुटुंब सहाय्य योजनेच्या प्रकरणांच्या चौकशीला सर्कल सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी घेत आहेत, तरी चौकशी पूर्ण करत नाहीत.
तरी महाशयांना विनंती आहे, की ही प्रक्रिया साधीसोपी, सुलभ करावी. प्रकरणे थेट नामंजूर न करता योग्य त्या प्रकरणांना किरकोळ त्रृटींची पूर्तता करण्यासाठी संधी द्यावी. गत 3 मिटिंगमध्ये नामंजूर करण्यात आलेली प्रकरणे आता होणार्या मिटिंगमध्ये ठेवत त्यांचा फेरविचार करण्यात यावा आणि लोकांमधील असंतोष दूर सारावा. अन्यथा या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असे निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष भिमराव वानखेडे यांनी इशारा दिला आहे.तसेच
माहितीस्तव प्रत आमदार अनिल भाईदास पाटील
भूमिपूत्र आमदार ः वि.स. मतदारसंघ, अमळनेर व
मा.जयश्रीताई अनिल पाटील
अध्यक्ष ः संगांयो, अमळनेर
यांना रवाना केली आहे ..
खान्देश समाचार....
