अमळनेर(प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांच्या मार्फत राजमाता जिजाऊ महिला मंडळ अमळनेर यांनी स्थापन केलेल्या “मातोश्री इंदुताई अग्रो फार्मर प्रोडुसर कंपनी लि. टाकरखेडा ता.अमळनेर जि.जळगाव यांच्या कृषि औजारे बँकेचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कृषि सेवा केंद्र व कृषि उत्पादित शेतमाल खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. प्रशिक्षण सत्राचे उदघाटन श्रीकांत झांबरे जिल्हा प्रबंधक नाबार्ड जळगाव यांनी केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेबसाईटचे प्रसारण केले. शेती उत्पादित मालावर छोटे-छोटे उद्याग उभारण्याचे आवाहन शेतकर्यांना श्री.अरुण प्रकाश एल.डी.एम. यांनी केले यासाठी जळगाव जिल्ह्यातील बँका आपल्याला अर्ध असहाय्य करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले स्मार्ट योजने अंतर्गत मूल्य साखळी विकसित करण्यासाठी उत्पादित कंपन्या कुरबाग तडवी प्रकल्प संचालक आत्मा यांनी आव्हान केले. कृषि विभागाच्या विविध योजना विठ्ठल जाधावर उपविभागीय कृषि अधिकारी अमळनेर यांनी सांगितल्या. परिसरातील शेतकर्यांनी पिक कर्जाचा लाभ घेण्याचे आव्हान शामकांत ठाकरे मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक शाखा अमळनेर यांनी केले. प्रधान मंत्री सुदान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत सागर धनाड जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी माहिती दिली, कार्तिक दहीकर उपशाखा अधिकारी भारतीय स्टेट बँक अमळनेर, झांबरे साहेब कृषि अधिकारी स्मार्ट जळगाव, प्रवीण पाटील, अमोल कोढावदे, निलेश पाटील कृषि सहाय्यक, भूषण पाटील तंत्र अधिकारी आत्मा अमळनेर, तुषार गरुड विभागीय व्यवस्थापक समुन्नती फायनान्स धुळे, जळगाव. उमेश दुबे ITC कंपनी नागपूर, रामभाऊ भिल सरपंच टाकरखेडा, प्रकाश पाटील मा.सरपंच टाकरखेडा, प्रभाकर पाटील, सुशील पाटील, शंतनू पाटील, ह.भ.प. कैलास महाराज, एच.आर.कढरे, उपस्थित होते. संचालक - सौ.पुनम भटू पाटील, सुरेखा प्रभाकर पाटील, छायाबाई कालिदास पाटील, प्रेमराज श्रीराम पाटील, राजेंद्र रामभाऊ पवार, सी.ई.ओ.-ऋषिकेश शिरसाठ, प्रकाश शरद पाटील. मातोश्री इंदुताई अग्रो शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर पुनम पाटील यांनी आभार मानले.
खान्देश समाचार...
प्रविण बैसाणे✍️
