अमळनेर (प्रतिनिधी)दि.29 सप्टेंबर रोजी साने नगर येथील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांचा प्रमुख मागण्या अश्या होत्या की,बोरी नदीच्या पैलतीरी जाण्यासाठी शेतकऱ्यांना नदीच्या पुरातून जाणे भाग पडते .म्हणून त्यांच्या गुराढोरांना व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांची जमीन नदीच्या पलीकडे असल्यामुळे फरशी पुलाची मागणी ऐरणीवर आहे. अनेक वर्षापासून ही प्रमुख मागणी लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्ष व दूरदृष्टीच्या अभावामुळे प्रलंबित पडलेली आहे. तसेच स्मशानभूमीला जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नसल्यामुळे प्रेताची विटंबना होते,महाशयांनी महादेव पुराकडे जाणारा व स्मशान भूमी कडे रस्ता कायमस्वरूपी डांबरीकरण करून मिळावा तसेच श्रीकृष्ण मंदिर ते महादेव मंदिर हा रस्ता त्वरित काँक्रीट करण डांबरीकरण करून मिळावा .या सर्व मागण्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आमदार आणि खासदारांनी या समस्यापूर्तीचे गाजर दाखवले आहे. व जनतेला ठेंगा दाखवला आहे .त्या अनुषंगाने सर्व शेतकरी कष्टकरी नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून सामाजिक कार्यकर्ता संदीप भैय्या सैंदाणे व दीपक रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी मा.सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले .निवेदनावर दोनशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .निवेदन देताना अरुण पाटील टेलर ,रावसाहेब आबा पैलवान ,माजी नगरसेवक बाळा पवार ,प्रवीण आबा पाटील ,महेश पाटील, विकास सोसायटी चेअरमन भास्कर ठाकरे, आबा नीलकंठ पाटील, ईश्वर महाराज, सोसायटी संचालक रामकृष्ण पवार, आबा पाटील, दीपक लोटन पाटील ,सुभाष पाटील, संदीप पवार ,नितीन पाटील, दिलीप पाटील, रत्नाकर पाटील ,राजमल पाटील, बंटी पिंजारी, गोपाल पाटील ,तसेच साने नगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खान्देश समाचार✍️
प्रविण बैसाणे