अमळनेर(प्रतिनिधी)भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा शोषित जनतेचा पक्ष असून त्यांचे पैसे व सहभागातून या पक्षाचे कार्य चालते इतर भांडवलदारी पक्षांसारखे पक्ष चालत नाही. सध्याची परिस्थितीत जनतेचे प्रश्न वाढत आहेत, पण मोदी सरकार हिंदू-मुस्लिम तनाव या बाबींचा सहारा घेऊन चालत आहे, पण त्याबरोबर विरोधी पक्षांची सरकार 50 /50 खोके घेऊन पाडण्यात येत आहेत.अशही स्थितीत बिहार आणि दिल्ली तील विरोधी आमदार खोक्यांच्या राजकारणाला बळी पडले नाहीत त्यामुळे संपूर्ण राजकारण हे खोक्यांवर चालते या मोदी सरकारचा समजला छेद बसला आहे म्हणून आजचे केंद्र सरकार कायमचे मानगुटीवर बसेल अशी भीती मनातून काढून टाका भविष्यकाळ आपलाच आहे या निरधाराणे भाकप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आंदोलनात तनमन धनाने सहभागी व्हावे असे आवाहनभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ अमृत महाजन यांनी अमळनेर येथील ताडेपुरा येथे आयोजित अमळनेर तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शाखा मधील कार्यकर्ता परिषद मध्ये केले..
अध्यक्ष स्थानी का प्रभुदास कसबे व कॉम्रेड चंद्रकांत माळी दहीवद है होते .
परिषदेला भारतीय कम्युनिस्ट जिल्हा सचिव कॉ लक्ष्मण शिंदे यांनी कामाचा अहवाल मांडला. सुरुवातीला शहीद भगतसिंग व अंमळनेर कामगार लढ्याचे हुतात्मा काँ श्रीपत पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.. या परिषदेत ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्या का उषाबाई पवार यांच्या सत्कार करण्यात आला. या परिषदे त तालुक्यातील नऊ कार्यकर्त्यांची तालुका कौन्सिल निवडण्यात आली या कौन्सिल मध्ये सचिव म्हणून काँ वाल्मीक महिराले काँ चंद्रकांत माळी, लक्ष्मण शिंदे निर्मला शिंदे, दीपक पारधी त्र्यंबक धनगर, दीपक चौधरी प्रभुदास कसबे, व कायम निमंत्रित.
उषाबाई पवार अशी निवड करण्यात आली होती.
खान्देश समाचार...
प्रविण बैसाणे
