अमळनेर:-(प्रतिनिधी)सांस्कृतिक बुद्ध विहार फरशी रोड अमळनेर येथे, वर्षावास प्रवचन मालिका प्रसंगी प्राध्यापिका मीनाक्षी इंगोले यांनी "त्यागमूर्ती माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी माता रमाईचे संपूर्ण जीवन हे दुःख, दारिद्र्य, कष्ट, यातना,उपासमारीने भरलेले दिसून येते. त्यांनी आपल्या जीवनात कधी सुख, समृद्धी, अनुभवली नाही. आपले संपूर्ण जीवन त्यांनी बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला समर्पित केले होते. माता रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ ला दापोली तालुक्यातील 'वनंद' येथे झाला रुक्मिणी आणि भिकाजी धोत्रे हे त्यांचे आई वडील. लहान वयातच रमाईच्या आई वारल्या दुःखाचा डोंगर पार होतो न होतो तोच तीन ते चार महिन्यातच वडिलांचे निधन झाले. लहान वयातच रमाई वर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. वलंगकर काका व गोविंद पुरकर मामा हे त्या परिवाराला घेऊन मुंबईच्या भायखडा मार्केटच्या चाळीत राहण्यासाठी घेऊन गेले. त्याकाळी बालविवाह पद्धत रूढ होती,त्यामुळे सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या भीमासाठी वधू पाहत होते. भायखळा मार्केटमध्ये वलंग करांकडे लग्नाची मुलगी असल्याचे सुभेदारांना कळले. सुभेदाराना भीमासाठी रमा पसंत पडल्या.१९०६ मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने रमाई व भीमरावांचे लग्न भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्ष होते. रमाईने मीरा आत्यांकडून बाबासाहेबांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या तेव्हा त्यांना कळाले की बाबासाहेबांना शिक्षणाचे प्रचंड गोडी आहे. १९१३ ते १९१६ या काळात ते अमेरिकेला होते व जुलै १९१६ ते १९१७ या वर्षात ते जर्मनीला उच्च शिक्षण घेत होते.त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती परंतु त्याची कोणतीही जाणीव रमाईंनी बाबासाहेबांना होऊ दिली नाही. एकदा तर बाबासाहेबांना परदेशी जावे लागल्यामुळे ते रमाईला घेऊन धारवाडच्या वराडे मित्रांकडे गेले. वराडे काका धारवाड येथे मुलांचे वस्तीगृह चालवत होते त्या ठिकाणी रमाईंना असे आढळून आले की वसतिगृहाला अन्नधान्याचे अनुदान न मिळाल्यामुळे दोन-तीन दिवसापासून मुलं उपाशी आहेत, तेव्हा रमाई अत्यंत वाईट वाटले त्याचवेळी त्यांनी कुठलाही विचार न करता अंगावरील दागिने वराळे काकांना देऊन मुलांना अन्नाची व्यवस्था करा असे सांगितले. तेव्हापासून त्या दिनदुबळ्यांच्या अनाथांच्या कष्टकऱ्यांच्या रमाच्या रमाई माता झाल्या. १९१३ मध्ये रामजी सुभेदार यांचे निधन झाले त्यानंतर रमेशचा मृत्यू, ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांच्या सावत्र आई जिजाबाईंचा मृत्यू, मुलगी इंदू. असे एकापाठोपाठ गेल्यामुळे माता रमाईच्या जीवनातील हा अत्यंत कठीण काळ होता. रॅनसे मॅक्डोनंट यांनी गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी सुचविलेल्या मुद्द्यांचा विचार करून, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा विचार केला. तेव्हा महात्मा गांधींनी या प्रस्तावास विरोध केला. एवढेच नाही तर येरवडा येथे आमरण उपोषणही केले. तेव्हा बाबासाहेबांना अनेक धमक्या येत होत्या त्यामुळे रमाईंना डॉ बाबासाहेबांची काळजी वाटू लागली. त्यातच टीबीच्या आजाराने उग्ररूप धारण केले.२७ मे १९३५ रोजी दादरच्या राजगृहात सकाळी नऊ वाजता यशवंतासह नऊ कोटी जनतेला माता रमाई पोरक्या करून गेल्या डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील हा सर्वात मोठा आघात होता. रमाई गेल्यानंतर आठ दिवस बाबांनी स्वतःला कोंडून घेतले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाईची भूमिका फार अनमोल अशी होती डॉ. बाबासाहेबांना रमाईचा तीस वर्ष अविस्मरणीय असा सहवास लाभला. अशा या त्याग मूर्ती मातेच्या प्रतिमेला त्रिवार अभिनंदन करून त्यांनी आपले व्याख्यान थांबवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सी एम नेतकर यांनी केले तर आभार राजेंद्र गायकवाड सर यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी डी आर सैंदाणे, बापूराव संदानशिव, विद्याताई सैंदाणे, ज्योती बिऱ्हाडे, पंचशीला संदानशिव, हरिभाऊ वाघ,प्रा.डॉ. वानखेडे सर, अनिल बनसोडे, सोमचंद संदानाशिव, विनोद बिऱ्हाडे, देवदत्त संदानशिव, ज्ञानेश्वर निकम,ए एन घोलप,प्रा.डॉ.बी बी भालेराव, श्रीकांत खैरनार,संदीप भैय्या सैंदाणे. मिलिंद निकम,अर्जुन संदानशिव,एड.शिवकुमार ससाणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
खान्देश समाचार..
प्रविण बैसाणे
