अमळनेर:(प्रतिनिधी)शेतात मोलमजुरी करून काबाडकष्ट करून जमा केलेले १३ हजार रुपये बॅगमध्ये ठेवलेले असताना ती बॅग एका महिला प्रवाशाकडून चुकून धुळे - चोपडा बसमध्येच राहिली; परंतु एसटी महामंडळाच्या चोपडा आगार बसस्थानकातील वाहक किरण चव्हाण(रा.अमळनेर)आणि चालक आर.आर.साळुंखे यांनी सतर्क राहून बस तपासणी करत असताना एक बेवारस बॅग व वस्तू असल्याचे लक्षात आले त्या बॅगेची चौकशी केली असता त्यात 13000 रुपये आणि मोबाईल नंबर असलेले चिठ्ठी आढळून आली,त्या कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीवरील नंबरवर कॉल करून त्यांना चोपडा आगारात बोलावून घेतले आणि चौकशी करून ओळख पटल्यानंतर आगार व्यवस्थापकांच्या समोर १३००० रुपये सह संपूर्ण वस्तू त्या महिलेच्या स्वाधीन केले, त्यावेळी घाबरलेल्या त्या महिलेच्या डोळ्यांनी अश्रू अनावर झाले होते,त्या महिलेने वाहक-चालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रमाणे कर्तव्यदक्ष वाहक किरण चव्हाण व चालक आर.आर साळुंखे यांचा प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चोपडा आगार व्यवस्थापक श्री संदेश क्षीरसागर यांनी आगाराच्या वतीने वाहक किरण चव्हाण तसेच चालक आर आर साळुंखे यांच्या सत्कार करून अभिनंदन केले, त्यावेळी चोपडा आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
खान्देश समाचार
प्रविण बैसाणे,अमळनेर
