अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस जवानांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवले आहेत.सुरत जाणाऱ्या धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाय अटकून घसरत जाणाऱ्या वृद्ध महिलेचे एक आरपीएफ जवानाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्राण वाचवल्याची घटना नुकतीच घडली.
आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक कुलभूषणसिंग चव्हाण सोबत महेंद्र मिश्रा जळगावहून अमळनेरला उतरले. त्याचवेळी सुशीला भगवान पाटील (वय ६३) रा. उधना, सुरत या महिलेला तिचा नातू सचिन सोडायला आला होता.
रेल्वे गाडी आल्यावर सुशीलाबाई रेल्वेत चढली तशी गाडी सुरू झाली आणि तिचे पाय पायरीवरून सटकून प्लॅटफॉर्मच्या गॅप मध्ये अडकल्या. सुशीलाबाई फरफट जाऊ लागली आरडाओरडा सुरू झाला. महेंद्र मिश्रा यांचे लक्ष जाताच त्यांनी धावत जात त्यांनी महिलेचे हात वर उचलून तिला धावत्या गाडीत आत ढकलले, महेंद्र यांचा तोल जाऊन ते देखील गाडी खाली सापडू शकले असते परंतु RPF जवानाच्या हिम्मतीमुळे त्या महिलेच्या प्राण वाचले आहेत. सुशीलाबाई तिचे नातेवाईक आणि प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांनी महेंद्र मिश्रा यांचे कौतुक केले.
खान्देश समाचार..
