अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चांगलाच कारवाईच्या धडाका सुरू केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांनी गावठी हातभट्टी चालकावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बहादरपूर रोडवरील कंजर वाडा भागात बिंदीया लालसिंग कंजर ही चालवत असलेल्या गावठी हातभट्टी दारू ठेक्यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात पाच हजार रुपये किमतीचे 200 लिटर गूळ व नवसागर रसायन पाणी व 500 रुपये किमतीची हातभट्टी ची तयार दारू असा एकूण साडे पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला. महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्रता झरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदिया लालसिंग कंजर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक दीपक माळी,रवींद्र पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल नम्र जरे यांच्या पथकाने कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ह्या कार्यवाही मुळे हातभट्टी दारू विक्रेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.
खान्देश समाचार,अमळनेर
प्रविण बैसाणे..✍️
