अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात अवैद्य गांजा विक्रीसाठी येतअसल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे अमळनेर शहरात बस स्थानक परीसरात आरोपी रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे रा. हिसाळे ता. शिरपुर जि.धुळे हे त्यांचे स्वतःचे फायदयाकरीता गैरकायदा 15 किलो 566 ग्रॅम वजनाचा किं. रु.2,30,000/-किमंतीचा गुंगी आणणारा गांजा ओलसर काळे पत्तीचा मादक पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने कब्जात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आले.वरील आरोपी क्र.02 हा पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला असून, सफौ राजेंद्र कोठावदे यांचा फिर्याद वरुन अमळनेर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पो.अधि. श्री.एम रामकुमार सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सो. यांच्या मार्गदर्शनाने पोनि / विजय शिंदे स्वता समक्ष व त्यांचे
पथकातील सफौ/ राजेंद्र कोठावदे, पोहेकाँ/ किशोर पाटील, पोना/दिपक माळी, पोना/ रविंद्र पाटील, पोना/ मिलींद भामरे, पोना / सुर्यकांत साळुखे, पोना/ सिंध्दात सिसोदे, पोकाँ / हर्षल पाटील, पोकाँ/ विलास बागुल, पंच 1) श्री. प्रदीप अशोक भदाणे रा. वजीरखेडे ता.मालेगांव (तलाठी- मुडी ता. अमळनेर) 2) निलेश अशोक पवार रा. आदर्श नगर, चोपडा, फोटोग्राफर सागर राजेंद्र पाटील व तराजु मापक रोहन जगदीश आठवले अश्यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि विजय शिंदे हे करत असुन आरोपी क्र. 1) राधेशाम रामसिंग पावरा रा. हिसाळे ता. शिरपुर जि.धुळे यांस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
खान्देश समाचार...
