अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथील तरुण वडिलांचे छत्र हरपलेला व मिळेल ते काम करणारा होतकरू तरुण दिनेश संजय पाटील (वय-२२) अमळनेर येथून दि.22 रोजी संध्याकाळी कामा वरून घरी येत असताना चोपडा नाका पैलाड येथे अपघात होऊन गंभीर जखमी झाला होता.
त्या ठिकाणी पैलाड भागातील तरुणांनी त्याला तातडीने डाॅ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले होते,परंतू मेंदूला तसेच छातीला गंभीर दुखापत झाल्या मुळे त्याला पुढील उपचारा साठी मुंबई येथे घेऊन जाने अत्यावश्यक होते.त्यामुळे त्या तरुणाला मुंबई कडे घेऊन गेले आहेत.परंतु पुढील उपचारासाठी अधिक पैशांची गरज असल्यामुळे तसेच त्या तरुणाच्या घराची परिस्थिति हलाखीची असल्यामुळे गावातील लोकांनी तसेच कामाला होता यांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन शक्य ती मदत केली आहे.
मदतीचे आवाहन....
तरुणाच्या आईने दानशूर व्यक्तींनी कृपया माझ्या मुलाच्या पुढील उपचारासाठी शक्य होईल ती मदत करावी अशी विनंती केली आहे...
( Phonepay No.9325671039 दिपक पाटील..)
