अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर रेल्वे स्थानकावर काही दिवसापूर्वी रेल्वे सुरक्षा पोलीस जवानांने एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवले होते.सुरत जाणाऱ्या धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाय अटकून घसरत जाणाऱ्या वृद्ध महिलेचे आरपीएफ जवानाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्राण वाचवल्याची घटना नुकतीच घडली होती.
रेल्वे सुरक्षारक्षक जवान महेंद्र मिश्रा यांचे रेल्वे सल्लागार समितीकडून या जवानाच्या हिम्मतीचे तसेच आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा बद्दल रेल्वे सल्लागार समितीकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी अमळनेर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बापू हिंदुजा,विनायक पाटील, नविद शेख,नईम पठाण,श्रीमान ACM आर.के शर्मा,TI एल.बि सिंग,देसाई साहेब,PSI कुलभूषण चौहान,व अमळनेर रेल्वे स्टेशन मास्तर इत्यादी कडून RPF जवान महेंद्र मिश्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच सर्व मान्यवरांकडून रेल्वे सुरक्षा जवानाचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
✍️ प्रविण बैसाणे...


