अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर शहर,अमळनेर लोहमार्ग,नंदुरबार जी.आर.पी अश्या ठिकाणी गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला फरार असलेला कुख्यात गुन्हेगार रामजाने यास अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील कुख्यात गुन्हेगार रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील याचावर यापूर्वी नंदुरबार जीआरपी (अमळनेर लोहमार्ग दूरक्षेत्र) येथे जबरी चोरी, लुट मारीचे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, खंडणी तसेच जिवानिशी ठार मारणे असे गुन्हे दाखल आहेत.तसेच चाकू सुरे ताब्यात बाळगून रेल्वेतील प्रवास करणारे तृतीय पंथी यांच्यावर त्याचे साथीदारासोबत दहशत करून जबरदस्तीने प्रत्येक 1000 रुपयांची हफ्ता वसुली करणे, रेल्वे प्लॅटफॉर्म वरती प्रवाशांकडून जबरीने पैसे हिसाकावने असे गुन्हे करत होता.
तसेच दि.20 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस अमळनेर रेल्वे प्लॅटफॉर्म वरती सचिन पाटील वय -22 रा. शिवशक्ती चौक यास चाकूने मारून मोबाईल हिसकावून नेला होता, त्याबाबत गुन्हा दाखल होता, नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जीवे ठार मारण्याच्या व जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. सदर गुन्हा वांटेड होता, आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असल्याने त्या रेल्वे पोलीस देखील दचकत होती.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेला गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील गांधलीपुरा भागातील मामाजी व्यायाम शाळा जवळ सदर गुन्ह्यातील आरोपी रामजाने उर्फ राहुल पाटील हा एक धार पत्त्याचा अनुकुचीदार स्टील चा मोठा चाकू हातात घेऊन दहशत माजवत असल्याचे समजले, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे सह पथकाने मोठ्या शिताफीने जीवाची पर्वा न करता त्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात यश आले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर कार्यवाहीत स्वतः पोलीस निरीक्षक सह पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो हेकॉ सुनील हटकर, पोहेकॉ किशोर पाटील, पोना रवींद्र पाटील,पो ना शरद पाटील, पोना दीपक माळी होते, सदर गुन्ह्यातील तपास पोहेकॉ कपिल देव पाटील करीत आहे.
प्रवीण बैसाने...
