अमळनेर:(प्रतिनिधी) पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी मिळून जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता.
मागील सुमारे दोन वर्षात अमळनेर येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवताना तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले,त्यांची कार्यकीर्द हि सामाजिक सालोखा तसेच न्यायाचा दृष्टीने अत्यंत महत्वाची होती.दबंग, कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची जळगाव MIDC येथे पोलिस निरीक्षकपदी बदली झाल्याबद्दल अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते.
तसेच विविध मुस्लिम सामाजिक संघटना मार्फत निरोप संभारंभ आयोजित करण्यात आलं होता, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव व विविध समाजातील कार्यकर्ते यांचा हस्ते पो.नि हिरे यांचा सपत्नी तसेच आई यांचा सत्कार करण्यात आला होता.
त्याप्रसंगी पो.नि हिरे म्हणाले कि,पृथ्वी हि गोल आहे,आपण पुन्हा भेटूच..! तसेच ,अमळनेरकरांनी दिलेले प्रेम हिच माझा कामाची पावती आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचा ही सत्कार करण्यात आला होता.
अमळनेरकर उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा. डॉ.विजय तुंटे यांनी परिचय पोलिस अधिकारी डॉ.शरद पाटील यांनी करून दिला,तर आभार प्रदर्शन सोमचंद संदानशिव यांनी केले होते.
तसेच संध्याकाळी अमळनेर पोलीस विभाग आणि अमळनेर मित्र परिवार यांचा मार्फत अमळनेर तहसील कार्यालया समोरून DJ आणि ढोल ताशांच्या गजरात सजविलेल्या जीपवरून शहरातून मिरवणूक काढून नाचत गाजत पोलीस लाईन येथील मैदानात भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. अशाप्रकारे निरोप देण्यात आला. या वेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक भावनाविवश झाले होते.
प्रविण बैसाणे,अमळनेर




