अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करत आहेत. कारण राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्य करून तसेच महाराष्ट्राला भक्कम नेतृत्व देण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक प्रवेश करत आहेत त्याच अनुषंगाने तालुका अध्यक्ष संदीप काटे शहराध्यक्ष धनंजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली
शहरातील अर्जुन ज्ञानेश्वर सरोदे, रोहित चेतन सरोदे, दीपक सिताराम पाटील अर्जुन धर्मा पारधी,राहुल ज्ञानेश्वर सरोदे,कृष्णा चेतन सरोदे,आकाश अतुल सरोदे,सोनू शिवा सरोदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत यांनी मनसेमध्ये प्रवेश केला अर्जुन सरोदे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.त्यावेळी शहर उपाध्यक्ष करण पाटील, तालुका उपाध्यक्ष रवी भाऊ नेरकर तालुका सचिव सागर पाटील शहर सचिव निलेश भावसार विभाग अध्यक्ष बापू चौधरी, अंकित गव्हाणे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रविण बैसाणे,अमळनेर
