अमळनेर:(प्रतिनिधी) सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणूक 2022 होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उपद्रवी लोकांवर वचक बसावा यासाठी पोलीस सज्ज असावे याकरीता पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनच्यावतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.तसेच आज मतदानाच्या दिवशीही सुंदर पट्टी, नगाव बुद्रुक, हेडावे,जानवे इत्यादी गावातील मतदान केंद्रांवर पोलीस विभागामार्फत भेटी देणे सतत सुरू आहे जेणेकरून कुठेही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होणार नाही.
अमळनेर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याबाबत नागरिकांना कळविण्याच्या दृष्टीने रूटमार्ट चे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुकी दरम्यान कोणी ही कायद्याचे उल्लंघन करू नये, जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले आहे.
प्रविण बैसाणे,अमळनेर

