भवरखेडे,ता.धरणगाव(प्रतिनिधी) ६ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यालय भवरखेडे शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यालयात त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापिका,श्रीमती.सोनल पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयाचे शिक्षक समाधान पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज ठाकरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक समाधान पाटील,राजेश ठाकरे,गणेश पाटील,अजय बाविस्कर,पंकज ठाकरे,स्वप्नील पवार व विद्यार्थी उपस्थित होते.
पत्रकार प्रवीण बैसाणे, अमळनेर
