अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील शनिपेठ चोपडा रोड, स्मशान भूमी समोरील परिसरात रात्रीच्या सुमारास दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरांनी धुमाकूळ घातला होता.
चोरांनी या परिसरातील ऑटो रिक्षांच्या बॅटऱ्या, तसेच इतर वाहनांचे साहित्य चोरण्याच्या प्रयत्न केला,त्यात सोबत रिक्षा ची बॅटरी घेऊन गेले आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास काही तरी हालचाली दिसून आल्याने काही नागरिकांनी चोराला पकडण्यात प्रयत्न करण्यात आला, परंतु चोर स्मशानभूमीच्या पाठीमागून पडण्यास यशस्वी झाले होते, रात्री एक चोर दिसून आला होता परंतु चोरांची संख्या जास्त असावी शंका परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच त्या परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
या परिसरातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन लवकरच उप विभागीय पोलिस अधिकारी मा. राकेश जाधव साहेब यांच्याशी चर्चा करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे खान्देश समाचारच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
खान्देश समाचार..
प्रविण बैसाणे,अमळनेर
