अमळनेर:(प्रतिनिधी)दिवंगत प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) साजरा केला जात आहे. त्यानिमित्त अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने अमळनेर शहरातील ग्लोबल स्कूलच्या इयत्ता नववी तसेच दहावीच्या विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच शिक्षक यांची "भेट पोलीस स्टेशनला" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी, त्यांना पोलिस खात्याच्या दैनंदिन कामकाजाविषयी प्राथमिक स्वरूपाची माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर पोलिसांकडील शस्त्रगार मधील शस्त्रांची माहिती देखील देण्यात आली होती. सदर कार्यक्रमात प्रत्येकी शाळेतील १२० ते १३० विद्यार्थी/ विद्यार्थिनी उपस्थित होत्या, तसेच विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल असलेली भीती मनातून काढून त्यांना पोलीस खात्याचे कामकाज समजावून सांगण्यात आले.सध्या स्थितीत सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, काही अडचण अगर माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळावे. असे मत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी व्यक्त केले.
खान्देश समाचार
प्रविण बैसाणे..✒️

