अमळनेर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले व अति प्राचीन, पवित्र असे श्री वर्णेश्वर महादेव मंदिर येथील शिवभक्तांनी आपल्या लोक वर्गणीतून सुमारे 121 किलो वजनाची भव्य पितळी घंटा निर्माण केली आहे आणि ही भव्य पितळी घंटा पावन अश्या महाशिवरात्रीच्या दिवशी उद्या दिनांक 18 फेब्रुवारी 2023रोजी सकाळी 7 वाजता संत सखाराम महाराज संस्थान(वाडी) पासून सराफ बाजार,दगडी दरवाजा,फारशी रोड वरून श्री वर्णेश्वर महादेव मंदिर पर्यंत मिरवणूक निघणार आहे, तरी सर्व शिवभक्तांनी बहुसंख्येने या मिरवणुकीत शामिल व्हावे आणि डी जेच्या तालावर महादेवाचे नाम स्मरण करून या पवित्र क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी विनंती वर्णेश्वर महादेव मंदिर येथील भक्तांनी केली आहे.
उद्या होणाऱ्या मिरवणुकीत 121 किलो भव्य पितळी घंटा तसेच देवादी देव महादेव मुखवटा मुख्य आकर्षणाचा विषय आहे.
खान्देश समाचार..
