अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पैलाड भागातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून नुकताच माजी विद्यार्थी तसेच माजी आजी शिक्षक यांच्या स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या स्नेह मेळावात माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी या हायस्कूल मधून शिक्षण घेऊन अनेक मोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत, तसेच आपल्या शाळेतील जुना आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला आले होते.
तसेच वस्तीगृहात राहणारे माजी विद्यार्थी व स्थानिक माजी विद्यार्थी यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.त्यानिमित्ताने त्या शाळेतील माजी शिक्षक वस्तीगृहातील भाऊसाहेब,शिपाई तसेच सध्या कार्यरत असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांना सन्मानाने फेटे बांधून, आनंद उत्सव साजरा करत नाचत शाळेपासून मिरवणूक काढण्यात आली होती.
तसेच माजी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडत असताना आनंद अश्रूंना वाट दिली त्याप्रसंगी अनेकांचे डोळे पानावले. माझी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तसेच शाळेतील काही प्रसंगांना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी हायस्कूलचे विद्यमान चेअरमन अविनाश रामभाऊ संदानशिव यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले व कौतुक केले.
मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक ए.सी पवार सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी संपूर्ण माजी विद्यार्थी
अतिशय भावनुक झाले होते.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी विनोद शिरसाठ,दीपक दाभाडे,वासुदेव मोरे,मोहन भोई,विनोद सोनवणे,प्रकाश खैरनार,भरत मोरे,रामदास खैरनार,जितेंद्र दाभाडे,मनोहर सोनवणे,सोमनाथ बाविस्कर, जितेंद्र हिवरे, कृष्णकांत शिरसाठ,सुनील बाविस्कर,तुषार धनगर,सुभाष समुद्रे,युवराज वानखेडे,कैलास पाटील,धर्मराज वारे,सुनील वारे,धर्मराज सोनवणे,महेंद्र खैरनार,शिवदास खैरनार,कृष्णा बाविस्कर ,बाजीराव बिऱ्हाडे, अनिल बिऱ्हाडे,मधुकर संदानशिव, विनोद बिऱ्हाडे,शांताराम मोरे, प्रकाश सोनवणे,जितेंद्र खोके, हिरालाल लांडगे तसेच विद्यार्थिनी रंजना सोनवणे,योगिता नेतकर, विद्या गठरे,ज्योती भोई ,सुनीता भोई, विद्या भोई उपस्थित होते .
सदर स्नेहसंमेलन कार्यक्रमात विनोद शिरसाठ व दीपक दाभाडे यांनी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वासुदेव मोरे यांनी केले होते.
खान्देश समाचार....✍️
माजी विद्यार्थी
प्रवीण बैसाणे,अमळनेर



