सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर
गलवाडे, झाडी,भरवस,सुंदर पट्टी, गांधली गावांवर
आता तिसऱ्या डोळ्यांची नजर
डीवायएसपी राकेश जाधव यांची संकल्पना
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहर गुन्हेगारीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. शहरी भाग सुरक्षित व्हावा,या व्यापक उद्देशाने मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना झाल्यामुळे चोरट्यांचा कल आता ग्रामीण भागाकडे वळली आहे.
मात्र ग्रामीण भागातही लोकसहभागाची संकल्पना रुजवत डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रेरणेने आणि आधार फाउंडेशनच्या सहकार्याने गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम, सुंदर पट्टी, गांधली या गावांमध्ये उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नुकताच या कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळा डीवायएसपी राकेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
मात्र ग्रामीण भागातही लोकसहभागाची संकल्पना रुजवत डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रेरणेने आणि आधार फाउंडेशनच्या सहकार्याने गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम, सुंदर पट्टी, गांधली या गावांमध्ये उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नुकताच या कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळा डीवायएसपी राकेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
अमळनेर शहरातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशाने डीवायएसपी राकेश जाधव यांनी लोकसहभागातून सुमारे ७० टक्के भागात सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत नेमके त्याच ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. शिवाय चोरट्यांचा कल ग्रामीण भागाकडेही वळला आहे. ग्रामीण भागात बैलजोडी, मोटारसायकल, शेती अवजारे, विद्युत मोटारी, घरफोडी आदी चोरीच्या घटना तसेच हाणामारी, मुलींची छेडछाड, निवडणुकीतील वाद आदी घटनांना आळा बसावा या उद्देशाने डीवायएसपी राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संकल्पना ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला.
सीसीटीव्ही कॅमेरे ही काळाची गरज असून वाईट कामे व गुन्हेगारीला यामुळे आळा बसला असून पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव साहेब हे जबाबदार व सुज्ञ अधिकारी म्हणून कार्य करत आहेत, आपण विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, वकील व सुज्ञ नागरिक म्हणून जाधव साहेबांसोबत जबाबदार नागरिक बनूया..
ॲड. तिलोत्तमा पाटील
सामाजिक कार्यकर्ता अमळनेर
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग प्रमाणे माननीय उपविभागीय अधीक्षक राकेश जाधव साहेब यांचे कार्य आहे, जसं बोलतात तसे करून दाखवतात सीसीटीव्ही कॅमेरा संदर्भात लोकसहभागातून सातत्य व संयमाने लोक चळवळ उभारून अमळनेर शहर व ग्रामीण भाग गुन्हेगारीमुक्त होत असून त्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार...
मा. ज्ञानेश्वर परबत कंखरे
सामाजिक कार्यकर्ते अमळनेर
ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे, आमच्या सुंदर पट्टी गावाच्या सुरक्षेला सीसीटीव्हीमुळे अधिक बळकटी मिळाली आहे. माननीय डी वाय एस पी राकेश जाधव साहेब यांची संकल्पना खूपच व्यापक असून भविष्यात खूपच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
मा. सुरेश पाटील
मा. लोकनियुक्त सरपंच आदर्श गाव सुंदरपट्टी
महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे..
अमळनेर शहरात तसेच ग्रामीण भागात माननीय उपविभागीय अधीक्षक राकेश जाधव यांच्या संकल्पनेने मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची ही चळवळ हाती घेतली आहे, त्यामुळे महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
सचिन मधुकर खंडारे
सामाजिक कार्यकर्ते अमळनेर
सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे शहरभर नेटवर्क पसरवल्यानंतर आता ग्रामीण भागाकडे कॅमेरे लावण्याचा सपाटा पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय श्री राकेश जाधव यांनी लावला आहे. यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल जन माणसातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी व गुन्हेगारी अमळनेर तालुक्यातून व शहरातून हद्दपार करण्यासाठी, डी.वाय.एस.पी. साहेबांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार... पारदर्शक ,दूरदृष्टी असलेले जबाबदारीचे भान असणारे अधिकारी महाराष्ट्रभर झाले तर खूप चांगले होईल हीच सदिच्छा आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा..
- भैय्यासाहेब सैंदाणे(अंबारे)
वंचित बहुजन आघाडी, अमळनेर
लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरा ची संकल्पना..
सीसीटीव्ही कॅमेºयांसाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून जमा झाला आणि त्यातून गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम या गावात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. वरील गावे ही मुख्य रस्त्यावर असल्याने चोरीच्या घटना घडू नयेत तसेच घटना घडल्याच तर गुन्हे शोधास मदत व्हावी म्हणून राकेश जाधव यांची संकल्पना, प्रेरणा आणि मार्गदर्शनाने गावातील नागरिकांनी साद देत लोकवर्गणी जमा करून कॅमेरे बसवून घेतले.
भविष्यात तालुक्यातील सर्वच गावे ही टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आणण्याचा राकेश जाधव यांचा मानस आहे. त्यासाठी नागरिकांनी लोकसहभागात पुढाकार घ्यावा आणि आपले गाव सुरक्षित करुन घ्यावे, असे आवाहन डीवायएसपी राकेश जाधव यांनी केले आहे.
सीसीटीव्ही कॅमेºयांच्या उद्घाटन सोहळ्याप्र्रसंगी झाडीचे सरपंच भुपेंद्र पाटील, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ, गलवाडेचे किशोर पाटील, सदस्य व ग्रामस्थ, भरवस, लोणपंचमचे सरपंच अशोक विनायक पाटील, उमेश हिम्मतराव पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, रामचंद्र हरचंद पाटील, विजय पाटील, पवनकुमार पाटील, प्रमोद पाटील, कपिल पाटील, विवेक पाटील, जयेश पाटील, अतुल पाटील, योगेश पाटील, दयाराम ठाकरे, सुशील पाटील, उदय पाटील, गोपाळ पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, संजय मिस्तरी, महेंद्र पाटील, अशोक पाटील, कुणाल पाटील, चेतन पाटील, गणेश देवरे, रवींद्र देवरे, महेश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, सुरेश पाटील, तेजस पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गोटू पाटील, शरद पाटील, गोरख पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, प्रवीण ठाकरे, ईश्वर पवार, अनिल पाटील, पंकज पाटील, समाधान पाटील, रंगराव पाटील, मंगेश पाटील, भिलालीचे लोकनियुक्त सरपंच महेंद्र राजपूत तसेच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष धीरज पवार व राजू पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कृती आराखडा तयार करून, लोकहितार्थ चळवळ अधिक गतिमान करा.
-उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव
अमळनेर शहर गुन्हेगारीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित व्हावा, यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत. उपविभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कृती आराखड्यात (अबंधित ४० टक्के निधी) अद्याप या संकल्पनेची तरतुद केली नसेल त्या ग्रामपंचायतींनी या संकल्पनेचा समावेश करुन घ्यावा, आणि ही लोकहितार्थ चळवळ अधिक जोमाने रुजवावी, जेणेकरुन अमळनेर तालुका गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होईल. अमळनेर शहर ज्या संकल्पनेने गुन्हेगारीमुक्त होत आहे, त्याचप्रमाणे तालुकाही गुन्हेगारीमुक्त व्हावा, या उद्देशाने सर्वांनी या संकल्पनेस पाठिंबा द्यावा. -राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर
डीवायएसपी राकेश जाधव यांच्या सातत्याने गांधली गावात सीसीटीव्ही चे लोकार्पण...
तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम गांधली गावाने राबवला यात ग्रामपंचायत व पीक संरक्षण संस्था मदतीने संस्थेने रुपये पन्नास हजार व पुढील वर्षासाठी पुन्हा पैसे देण्याचे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले सदर योजनेचे लोकार्पण गांधली येथे ग्रामदैवत काकासट महाराज यात्रेच्या निमित्ताने माननीय डीवायएसपी राकेश जी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिक संरक्षण संस्थेचे चेअरमन श्री धनंजय दत्तात्रय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी व्हॉ. चेअरमन दीपक पाटील व सर्व संचालक उपस्थित होते तसेच श्री प्रवीण आप्पा पाटील, अनिल पाटील, सुनील आप्पा, श्री रामकृष्ण महाजन सर सुधाकर आबा साळुंखे सुधाकर देशमुख, दिनेश पवार,किरण महाजन, श्री शांताराम महाजन, सुरेश कोळी सुनील, वासुदेव पाटील, शिवदास पारधी, नरहरी पाटील, सुनील महाजन, प्रशांत पाटील तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुणांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती.
श्री राकेश जी जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संदर्भात व त्याच्या आवश्यकते संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. याने गावातील सामाजिक सलोखा ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा महिलांच्या सुरक्षा तसेच शेतकऱ्यांच्या शेतमाल तसेच पशुधन सुरक्षा यासाठी कसा उपयोग होईल हे स्पष्ट केले.
याप्रसंगी गावातील दहा महिन्यापूर्वी एकाच रात्रीत झालेल्या दहा ठिकाणी झालेल्या घरफोडी संदर्भात सरपंच नरेंद्र पाटील यांनी माहिती दिली. हे सामूहिक अपयश असल्याने भविष्यात असा गुन्हा होऊ नये म्हणून श्री राकेशजी जाधव साहेब यांच्या संपर्कात आल्यामुळे गावात सीसीटीव्हीचे नियोजन केल्यास भविष्यात अशा दुर्घटना होण्यापासून टाळू शकतो हे साहेबांनी लक्षात आणून दिले त्यास ग्रामपंचायत सदस्यांनी प्राधान्यक्रम देण्याचे ठरवून लोकवर्गणीतून पैसा जमा करण्याचे निधी जमा करण्याचे ठरवले आणि सर्वात मोठा प्रतिसाद पीक संरक्षण संस्था गांधली च्या पदाधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांचा भरघोस निधी देऊन या कार्यास सुरुवात केली.







