अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात काही दिवसांपासून वातावरण काही प्रमाणात दूषित झाले असतांना तसेच नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरअमळनेर शहरात दिनांक ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ०७:३० ते ०८:२० वा.सुमारास
1. कसाली DP मोहल्ला, 2. माळीवाडा, 3. आखाडा मकान भाग येथे सिनियर PI विजय शिंदे यांनी स्वतः व अधिनस्त अधिकारी PSI अनिल भुसारे व PSI नरसिंह वाघ ASI विलास पाटील पोना शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, योगेश महाजन, कैलास शिंदे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यांनी काॅर्नर सभा घेतल्या.
सदर corner meet मध्ये ८० ते १०० तरूण मुले प्रत्येकी उपस्थित होते.
त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती, योग्य त्या सूचना दिल्या व मार्गदर्शन करण्यात आले होते.
हिंदू- मुस्लिम बाबतची मनातली तेढ व तीव्र विरोधाची भावना कशी कमी होईल यावर लक्ष दिले.
सोशल मीडिया वर कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओ शेयर अथवा वायरल करु नये, कोणतीही चुकीची घटना होत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीसाना देण्यात यावी, कोणीही चुकीची अफवा पसरविणार नाहीत या बाबत सूचित करण्यात आले होते. तसेच CCTV कॅमेरे बसवण्याबाबत सूचना देण्यात आला, सीसीटीव्हीमुळे बरेच गुन्हे उघडकीस येतात सदर कॉर्नर बैठकांमध्ये पोलीस विभागामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते.


