अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक प्रताप साळी यांच्या वाढदिवस धार्मिक,सामाजिक सेवेत दान-धर्म, अन्नदान व व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक असलेले उद्योगपती श्री. प्रताप साळी यांचे दोघं सुपुत्र विक्की तसेच मॉन्टी यांनी त्यांच्या संकल्पनेतून वडिलांच्या वाढदिवसाला अमळनेर शहरातील उप जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करून वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
साळी परिवार सदैव समाजसेवेचा वारसा तीन पिढ्यांपासून अविरत चालू आहे, कुठल्याही संकटात धार्मिक कामात गोरगरिबांच्या मदतीसाठी समाजसेवेसाठी तत्पर असलेले साळी परिवारातील युवा सुपुत्र उद्योजक यांनी आपल्या आजोबा तसेच वडील यांच्या समाजसेवेचा वारसा अविरत पुढे चालवीत आहे. आपल्या वडिलांच्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने सामाजिक कार्य करून साजरा करण्यात आला, तसेच यापुढेही हा वारसा असाच अविरत चालू असेल अशी ग्वाही साळी परिवारातर्फे देण्यात आली.
