अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथील ज्येष्ठ प्राध्यापक विश्वनाथ देविदास पाटील (भूगोल विभाग प्रमुख) यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. महाविद्यालय विकास समितीच्या सभेमध्ये सदर नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली. ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संस्थेचे अध्यक्ष आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील , ज्येष्ठ संचालक दादासो. युवराज काशिनाथ साळुंखे ,संस्थेचे संचालक भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे. तसेच संचालक रावसाहेब साहेबराव राजाराम चव्हाण, दादासो. नरेंद्र शांताराम पाटील, प्राचार्य डॉ. वसंत देसले व समितीतील सर्व संचालक यांनी निवड करून अभिनंदन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
