अमळनेर(खान्देश समाचार न्यूज
नेटवर्क) अमळनेर विधानसभा संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, आता त्यात माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील किंग मेकर ठरण्याची संकेत दिसून येत आहेत.
राजकारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे विश्वास, समर्थन आणि संपर्क यांचा अभाव कधीच सहन होत नाही. आता, अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीने एक नवा नायक पुढे आणला आहे - डॉ अनिल नथ्थू शिंदे. त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भक्कम समर्थन दिल्याने त्यांच्या विजयाची चर्चा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची सहकार्याने डॉ शिंदे यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील विधानसभेमध्ये उभे राहणार होते पण नंतर आमदारकी लढवण्याची इच्छा अचानक त्यांनी माघार का घेतली.. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आजही आहेत.. माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील महाविकास आघाडीला साथ देतील का? असे अनेक प्रश्न आहेत सध्या त्यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांना जर साथ दिली तर डॉक्टर शिंदे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होईल असेही बोलले जात आहे...
खान्देश समाचार अमळनेर
