अमळनेर : (प्रतिनिधी) आज सकाळी अमळनेर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून शुल्लक कारण म्हणजेच कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी सकाळी २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव परिसरात घडली.
मयत तरुण विकास प्रवीण पाटील वय ३० रा अमलेश्वर नगर हा आपल्या मित्रांसह पिंगळवाडे या गावी तमाशा पाहण्यासाठी गेला होता. मोटरसायकालिका कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. यावरून दोन्ही गटात अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. या हाणामारीत विकास याचा मृत्यू झाला. ही घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे माहिती कळताच सहाययक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , संजय पाटील यांनी घटनस्थथळी धाव घेतली. विकास याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. आरोपी फरार झाले होते.
एलसीबी पथकाने अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून संशयित आरोपी नितीन पवार , अमोल कोळी , हर्षल गुरव यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.
