अमळनेर :(प्रतिनिधी) मोठ्या प्रमाणात सुरू असलेला तालुक्यातील टाकरखेडा येथे अवैध जुगार अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख आणि ५ मोटारसायकली एक रिक्षासह ३ लाख४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धरणगाव व अमळनेर तालुक्यातील ९ आरोपींविरुद्ध जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी अवैध व्यवसाधारकाना मोठा झटका दिला आहे. तालुक्यातील टाकरखेडा येथे मोठा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी केदार बारबोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , एएसआय राजेंद्र कोठावदे , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशीव , निलेश मोरे ,उज्वलकुमार म्हस्के , गणेश पाटील ,अमोल पाटील , सचिन पाटील,राहुल पाटील,उदय बोरसे यांना संध्याकाळी टाकरखेडा येथे पाठवले. समाधान धर्मा पाटील यांच्या शेतशिवारात शनिमंदिराजवळ पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. पोलिसांनी तेथून प्रकाश भगवान महाजन माळीवाडा धरणगाव , भाईदास सोनू रा.लोणे अमळनेर, रमेश आत्माराम महाजन रा.हनुमान नगर धरणगाव , बापू जगन्नाथ पाटील शिवाजीनगर पैलाड, समाधान धर्मा पाटील टाकरखेडा , शिवलाल धर्मा पाटील टाकरखेडा , विजय पंढरीनाथ सोनवणे रा. निशाणे ता. धरणगाव , शिवदास प्रकाश धनगर रा नेहरूनगर धरणगाव , धंनजय श्रीराम चव्हाण बोरसे गल्ली अमळनेर यांना झन्ना मन्ना जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख व २ लाख२० हजार रुपये किमतीच्या ५ मोटरसायकली आणि १ रिक्षा असा एकूण ३ लाख ४६ हजार ९६० मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आला. अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या छापा टाकण्यात आला असून, आरोपींना पकडण्यात आले असून पुढील गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.
अमळनेर तालुक्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध जुगार अड्डे सुरू असून त्याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे, असे सर्वसामान्यांचे मत आहे.
