अमळनेर :(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील बंगाली फाईल येथील बालवीर व्यायामशाळेतर्फे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्त्यांची महादंगल होणार असून सुप्रसिद्ध पैलवान नेपाळ केसरी देवा थापा व हरियाणा केसरी शेरा पैलवान यांच्यात प्रमुख कुस्ती सामना होणार आहे.
पैलवान भरत पवार यांनी या कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले असून, इंदिरा भवन च्या मागे ग्रामीण रुग्णालयासमोरील मैदानात या स्पर्धा होणार आहेत. ऋतिक राजपूत धुळे आणि शमशाद पैलवान दिल्ली यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. यासह चुरशीच्या १३ कुस्त्या होणार आहेत. प्रमुख कुस्तीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर द्वितीय कुस्तीसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या कुस्त्यांसाठी पंच म्हणून युनूस पैलवान , आप्पा पाटील ,विनोद पैलवान , शकील पैलवान काम पाहणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बालवीर व्यायामशाळा , छत्रपती शिवाजी व्यायामशाळा , दि प्रतापकुमार व्यायामशाळा यांचे सहकार्य लाभत आहे. कुस्ती प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन बालवीर व्यायामशाळेतर्फे करण्यात आले आहे.
सदर कुस्त्यांच्या महा दंगल स्पर्धेत पंचांच्या निर्णय अंतिम असणार आहे, तसेच दंगा धोका करणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
- आयोजक
खान्देश समाचार..
संपादक - प्रविण बैसाणे.

