अमळनेर:(प्रतिनिधी)मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या एका पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. हे मंदिर महापालिकेनं पाडलं. देशभरातील जैन समुदायाकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.महापालिकेनं मंदिरावर केलेल्या कारवाईच्या विरोधात काल अमळनेर येथील जैन समाजाकडून अहिंसक मुक मोर्चा काढण्यात आला होता.
मुंबई येथील विलेपार्ले येथील जैन मंदिराची महानगरपालिकेकडून तोडफोडकरण्यात आली होती तसेच जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण सकल जैन समाज आक्रमक झाला आहे.
अमळनेर येथे जैन समाजाच्या वतीने शांततामार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला,अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की,जैन समाज हा शांतीप्रिय, अहिंसावादी असून, देशाच्या प्रगतीत आर्थिकदृष्ट्या मोलाचे योगदान देणारा समाज आहे. अशा समाजावर वारंवार हल्ले होणे, ही चिंताजनक बाब आहे. आमच्या धार्मिक श्रद्धांवर व साधू-संतांवर होणारे आघात रोखणे ही शासनाची जबाबदारी आहे. तसेच साधू-संतांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत व त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. विहार यात्रेदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष सुरक्षा पथकाची नेमणूक करावी. विहार प्रवासात अपघात होणार नाही याची शासनाने विशेष खबरदारी घ्यावी. विलेपार्ले येथील मंदिर तोडफोड ही अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावणारी घटना असून, या स्थळी लवकरात लवकर मंदिर पुन्हा उभारण्यात यावे.
जैन धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष कायदा करावा.
तसेच, काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सहभागी जैन बांधवांनी हातात निषेधाचे फलक धरून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात होत्या.त्यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.
तहसील आवारात सकल जैन समाजातर्फे पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना राजकुमार छाजेड, महेंद्रलाल कोठारी, घेवरचंद कोठारी, प्रवीण जैन, विजय जैन, डॉ. संजय शहा, संजय गोलेच्छा, राजेंद्र जैन, प्रा. एस. डी. ओसवाल, प्रकाश छाजेड, महावीर पहाडे, जितेंद्र जैन अशोक छाजेड यांच्यासह सकल जैन समाज मोर्चात सहभागी झाला होता.
खान्देश समाचार...
प्रविण बैसाणे


