अमळनेर:प्रतिनिधी(प्रविण बैसाणे) मागील ११ दिवसांपासून तांबेपुरा भागातील नागरिक पाण्यापासुन वंचित असुन नगर परिषद प्रशासनाला माञ कोणतेही ठोस उपायोजना करीत नाही अखेर आज येथील शिवसेना (शिंदे) उप शहर प्रमुख प्रविण पाटील व त्याचां सहकार्याकडुन नगर परिषदेसमोर स्वतः आंघोळ करून आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्त तांबेपुरा भागातील विविध नगरामध्ये सुमारे 11 दिवसापासून पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले असून त्यांची समस्या कोणीही सोडवत नसल्याने तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशीही नगरपरिषद तर्फे पाणी सोडवले गेले नाही व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे , यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी नगरपालिकाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतः आंघोळ करून नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले असून, तसेच ही समस्या न सुटल्यास पूर्ण तांबेपुरातील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे.
नगरपरिषदर्फे यावर्षी अनेक प्रभागात पाणीटंचाईची समस्या दिसून येत आहे तरी प्रभागातील पाणीटंचाई समस्या प्रशासनाने लवकरात लवकर सुरळीत करावी जेणेकरून नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
खान्देश समाचार....
