अमळनेर:प्रतिनिधी(प्रविण बैसाणे)उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी दरवर्षा प्रमाणे यंदाही सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे मंगलादेवी मित्र मंडळ व संकल्प फाऊंडेशनमार्फत नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई मंगला देवी चौक अमळनेर येथे बसवून एका चांगल्या उपक्रमाचा पायंडा पाडला असून असाच प्रकारे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सदर मंडळ घेत असते,त्यामुळे सदर उपक्रमाच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पाणपोईचे उद्घाटन...
सदर पाणपोईचे उद्घाटन
स्व.संतोष सोनू शेटे (मा. प्रशासन अधिकारी अमळनेर) यांच्या स्मरणार्थ करण्यात आले तसेच मंडळातील सभासद हर्षल महाजन याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या हस्ते पाणपोई च उद्घाटन करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष पंकज शेटे . धरम हटकर, शुभम येवले ,तुषार ठाकरे, निलेश निकम , राहुल बडगुजर, सागर सैंदाने,महेश मराठे,चेतन पाटील,पप्पू महेश्वरी,फकिरा महाजन , सोनू पाटील, ,यश येवले ,अक्षय पोरवाल , भास्कर ठाकरे, धिरज शेटे व मंगला देवी मित्र मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खान्देश समाचार...
