अमळनेर :(प्रतिनिधी) येथील मंगला देवी गणेश उत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे,यंदा अध्यक्षपदी महेश मराठे, उपाध्यक्ष हर्षा महाजन, सचिव मयूर ठाकूर, खजिनदार शुभम येवले, तर सल्लागारपदी भाऊसाहेब बडगुजर यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शेटे, धर्म हटकर ,लक्ष्मण पाटील,हर्षल सैंदाणे,भूषण महाजन,चेतन पाटील, दीप मराठे,सागर हटकर, साहिल शेटे, भावेश महाजन ,कृष्णा हटकर, भूषण बडगुजर,शुभम पाटील, धीरज शेटे ,सोमनाथ मराठे ,तुषार ठाकरे ,तुषार महाजन, असे सर्व मंडळाचे सभासद उपस्थित होते. सदर निवड सर्वानुमते घेण्यात आली होती.
दरवर्षाप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने साजरा करण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन गणेश भक्तांसाठी दरवर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. तसेच समाजाला जनजागृती करण्याचे काम मंडळा तर्फे होत असते.
यंदादेखील अशाच नानाविध उपक्रमांची रेलचेल असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीने सांगितले.खान्देश समाचार...
